पिपरी चिंचवडपुणे

पुणे जिल्ह्यात ४७ हजार १९७ रुग्णांनी केली कोरोनावर मात

PUNE CITY NEWS :-  पुणे जिल्ह्यात ७६ हजार ६६९ बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित ४७ हजार १९७ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. तर ॲक्टीव रुग्ण संख्या २७ हजार ६६३ इतकी आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.  यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील १९ हजार ४८८, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील ६ हजार ३२७, जिल्हा शल्य चिकीत्सक यांचेकडील ९३, पुणे कॅन्टोंन्मेंट १४४, खडकी विभागातील २४ , ग्रामीण क्षेत्रातील १ हजार ५८७, यांच्याकडील रुग्णांचा समावेश आहे.

पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित एकूण १ हजार ८०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगर पालिका क्षेत्रातील १ हजार २५४ , पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील ३२२ जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील ५३, पुणे कॅन्टोंन्मेंट ३१, खडकी विभागातील ३७, व ग्रामीण क्षेत्रातील ११२ , रुग्णांचा समावेश आहे.

तसेच ६९८ रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६१.५६ टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण २.३६ टक्के इतके आहे. पुणे जिल्ह्यात २ हजार २० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

Related posts

प्राणी क्लेश प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी – जिल्हाधिकारी

Vishal Khandagale

अजित पवार यांना स्वप्न पडत असतील तर आम्ही ही त्यांचे बाप आहोत: चंद्रकांत पाटील

Vishal Khandagale

पुणे शहर पोलिसांचा माणुसकीचा “डिजिटल पास”

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.