Pune City News
कोरोनापुणे

पुणे विभागातील 243 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी: डॉ.दीपक म्हैसेकर

Pune City News:- पुणे विभागातील 243 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 हजार 563 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 231 आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण 89 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 53 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

विभागात 1 हजार 563 बाधित रुग्ण असून 89 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्ह्यात 1 हजार 423 बाधित रुग्ण असून 81 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यात 35 बाधित रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात 65 बाधित रुग्ण असून 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यात 29 बाधित रुग्ण असून 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 11 बाधित रुग्ण आहेत.

आजपर्यत विभागामध्ये एकूण 16 हजार 670 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 15 हजार 706 अहवाल प्राप्त झाले आहेत. प्राप्त अहवालांपैकी 14 हजार 162 नमुन्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 1 हजार 563 चा अहवाल पॉझेटिव्ह आहे.

आजपर्यंत विभागामधील 57 लाख 15 हजार 360 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 2 कोटी 17 लाख 88 हजार 617 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 1 हजार 274 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भित करण्यात आले आहेत.

बातमी :- महासंवाद

Related posts

पुणे शहरातील पहिला 400 KW सौर ऊर्जा प्रकल्प कोंढव्यातील थ्री ज्वेल्स अपार्टमेंटमध्ये सुरू

Vishal Khandagale

सिद्धार्थ नगर येथे उभारण्यात येत असलेल्या गृह निर्माण प्रकल्पात पुढील दोन वर्षात पक्की घरे देण्यात येतील – मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके

Vishal Khandagale

मुठा, रिहे खोर्‍यातील ग्रामस्थांसाठी नवीन पीएम पीएमएल बससेवा

Vishal Khandagale

Leave a Comment