Pune City News
गुन्हे विषयकपुणे

पुणे शहरात गणेशोत्सवासाठी साडेसात हजार पोलिसांचा बंदोबस्त..

Pune City news:-  गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. सर्व मंडळांकडून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील बंदोबस्तासाठी पुण्यात साडेसात हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. अशी माहिती सहा. पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी दिली आहे.

या संदर्भात पोलीस आयुक्तालायत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली होती. यावेळी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपयुक्त संभाजी कदम, महापौर मुरलीधर मोहोळ, मितेश गट्टे, पुनीत बालन यांसह आदी उपस्थित होते.

दरवर्षी गणेशोत्सवासाठी जवळपास बारा हजार पोलीस रस्त्यावर बंदोबस्तासाठी उतरतात. मात्र, यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूकांना परवानगी नसल्याने सात हजार पोलीस कर्मचारी आणि सातशे पोलीस अधिकारी बंदोबस्तासाठी सज्ज होणार आहेत. तसेच आवश्यकतेनुसार हा बंदोबस्त वाढवला जाईल, असे आवाहन सहा. पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी केले आहे.

 

Related posts

भाजीपाला, गाळेधारक इतर व्यावसायिकांना न्याय मिळवून देणार : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

Vishal Khandagale

पेशव्यांच्या टांकसाळीच्या जागेतील गोपालकृष्ण मंदिराचा होणार जीर्णोद्धार 

Vishal Khandagale

जुलै अखेर 18 हजार कोरोनाचे रुग्ण असतील : महापालिका आयुक्त

Vishal Khandagale

Leave a Comment