Pune City News
पुणेमहाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेली नगरी सर्वांसाठी प्रेरणादायी; उद्धव ठाकरे

Pune City News:- अन्‍यायाविरुध्‍द लढण्‍याचे तेज ज्‍या मातीत रुजले आहे, त्‍या मातीचा आशीर्वाद आपल्‍या पाठीशी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या वास्‍तव्‍याने पावन झालेली नगरी आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी ठरलेली आहे.

भक्ती आणि शक्तीचा संगम या भूमीत आपल्याला बघायला मिळतो. या पट्टयात अनेक महान संत, क्रांतीकारक होवून गेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला अन्यायाविरुध्द लढण्याची शिकवण दिली आहे. आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग केला पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

जिल्‍ह्यातील आंबेगाव तालुक्‍यातील मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार नूतनीकरण कामाचे व कार्डियाक अँब्युलन्सचे ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्‍या हस्‍ते झाले. त्‍यावेळी ते बोलत होते.

कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्‍हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उप जिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे आदी होते.

*ठाकरे म्‍हणाले* : नागरिकांनी प्रशासनाला कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी सहकार्य करावे. कोरेाना विषाणूला जवळ येवू न देण्यासाठी नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे, प्रत्‍येकाने मास्कचा नियमित वापर करावा, वारंवार हात धुणे, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता करण्यावर भर देणे, संकटकाळात एकमेकांना मदत करणे यावर लक्ष दिले पाहिजे.

कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, मंचर नगरीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल, असा हा दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारुढ पुतळा मंचरच्‍या वैभवात भर घालणारा असून तो सर्वांनाच प्रेरणा देत राहील. असे वळसेपातील यांनी सांगितले.

Related posts

पुणे जिल्ह्यात २ लाख ६ हजार २९० कोरोनाबाधित रुग्ण

Vishal Khandagale

जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवणार; उपमुख्यमंत्री

Vishal Khandagale

जिवंतपणी चितेवर झोपून अनोखे आंदोलन ; प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न – नगरसेवक भैयासाहेब जाधव

Vishal Khandagale

Leave a Comment