Pune City News
कोरोनापुणे

पुण्यात ‘होम क्वारंटाइन’ असलेले रुग्ण बेपत्ता

Pune City News :- परदेशवारी करुन पुण्यात परतलेल्या नागरिकांना ‘होम क्वारंटाइन’ राहण्याचा आदेश दिला होता. त्यातील काही जण त्यांच्या घरी आढळून न आल्यामुळे, त्यांनी तातडीने *18002334130* या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे असे पुणे पोलिसांनी आवाहन केले आहे अथवा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

शहरात कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी सर्व प्रकारची काळजी घेतली जात असून परदेशातून आलेल्या परंतु, कोणतीही लक्षणे नसलेल्यांना 14 दिवस होम क्वारंटाइन राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. होम क्वारंटाइन असा शिक्काही त्यांच्या हातावर मारण्यात आला आहे.

पुणे शहरातील होम क्वारंटाइन केलेल्यांची यादी मागवून घेऊन पुणे पोलिसांनी त्यांच्यावर नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पुणे पोलिसांच्या 136 पथके या नागरिकांवर लक्ष ठेवून आहेत. या यादीनुसार पोलिसांनी घरी जाऊन पाहणी केली असता बहुतांश लोक त्यांच्या घरी आढळून आले. मात्र, होम क्वारंटाइनचा आदेश दिलेल्यापैकी काही जण त्यांनी दिलेल्या पत्त्यावर आढळून आले नाही.बेपत्ता झालेले हे नागरिक कदाचित त्यांच्या गावी अथवा दुसरीकडे वास्तव्यास गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related posts

कोरोना हॉटस्पॉट नसलेल्या भागांना दिलासा !

Vishal Khandagale

युवा उद्योजक पुनीत बालन यांची पुण्यातील चित्रपटसृष्टीतील कामगारांसाठी केली आर्थिक मदत

Vishal Khandagale

पुणे महानगपालिकेच्या आरोग्य अधिकारीपदी डॉ. नितीन बिलोलीकर

Vishal Khandagale

Leave a Comment