Pune City News
पुणे

पुणे महानगपालिकेच्या आरोग्य अधिकारीपदी डॉ. नितीन बिलोलीकर

पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतांना पहायला मिळत आहे. त्यात आरोग्य सेवा सांभाळणारे डॉक्टरच आजारी पडली आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून आरोग्य अधिकारी पदी डॉ. नितीन बिलोलीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी महापालिकेचे आरोग्य विभागाचे प्रमुख रामचंद्र हंकारे यांना मधुमेहाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना रजेवर सोडण्यात आले होते. याशिवाय सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांची चाचणीही करण्यात आली होती. त्यामधील दोन सहायक अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते.

त्यामुळे महानगरपालिकेत तातडीने आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी दीपाली धुमाळ यांच्याकडून करण्यात आली होती. त्यानंतर ही नियुक्ती करण्यात आली आहे.

Related posts

राज्यात येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा

Vishal Khandagale

विशेष पोलीस अधिकाऱ्यांच्या नेमणुकीचा उपक्रम यापुढेही सुरु ठेवावा – गृहमंत्री अनिल देशमुख

Vishal Khandagale

पुणे महापालिकेच्या सहा कर्मचाऱ्यांना कोरोना…!

Leave a Comment