PUNE CITY NEWS:- पिंपरी चिंचवड इथल्या कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पिंपरी चिंचवड शहरातील वायसीएम रुग्णालयाला भेट दिली. यावेळी सोशल डिस्टस्टिंगचा मात्र फज्जा उडाल्याचे चित्र पहायला मिळाले.
यावेळी महापौर उषा ढोरे, भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप , माजी खासदार अमर साबळे, स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे, सत्तारूढ पक्ष नेते नामदेव ढाके, उपमहापौर तुषार हिंगे, नगरसेवक बाबू नायर आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पुण्यात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढतांना डस्ट आहे. त्यामुळे आज फडणवीस हे पुण्यात कोरोनाचा आढावा घेण्यासाठी दाखल झाले आहेत.
मात्र त्यांच्याभोवती कार्यकर्ते आणि नेत्यांची मोठी गर्दी पहायला मिळाली. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव अजून वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावेळी रुग्णाची पाहणी करून त्यांनी विचारपूस केली.

