Pune City News
पिपरी चिंचवड

अज्ञात वाहनाची धडक; दोघांचा मृत्यू

PUNE CITY NEWS :- पिंपरी चिंचवड परिसरातील पुणे- मुंबई महामार्गलगत असणाऱ्या शिरगावजवळ दोघांचे मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात वाहनांच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईच्या दिशेने हे दोघेजण पिकअप वाहन घेऊन चालले होते. तेव्हा शिरगाव हद्दीत त्यांची गाडी बंद पडली.

त्यानंतर हे चालक आणि क्लिनर पुण्याच्या दिशेने पायी निघाले असावेत, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला जात आहे.

हे दोघे जण आपल्या वाहनापासून जेमतेम ६०० ते ७०० मीटर अंतरावर पोहचले असतील, त्यावेळी अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिल्याने, ते पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाच्या कडेला फेकले गेले.

दरम्यान, मृतदेहाची अवस्था पाहता हा अपघातच असल्याचे शिरगाव पोलिसांनी सांगितले.

Related posts

करोना आणि अन्य आजाराच्या रुग्णांवर वेळेत उपचार करा : जिल्हाधिकारी

Vishal Khandagale

“11 मजल्यावरून फेकून”सावकारकीतून असा झाला खून…

Vishal Khandagale

“सॅनिटायझर्स” व मस्क च्या काळा बाजारा करणरया वर पोलीसांची कार्यवाही

Vishal Khandagale

Leave a Comment