Pune City News
गुन्हे विषयकपुणे

कॅनॉलमध्ये उडी घेऊन रिक्षा चालकाची आत्महत्या

PUNE CITY NEWS :- पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या एका रिक्षा चालकाने कॅनॉलमध्ये उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

पोलिसांना कॅनॉलमध्ये एक मृतदेह आढळून आला आहे. मृतदेहाच्या खिशात चिट्ठी सापडली असून कोरोनाच्या धास्तीने आत्महत्या करीत असल्याचे त्यात नमूद केले आहे.

अनिल बाबुराव खाटपे (५४) असे आत्महत्या केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमवारी( २२)रोजी रात्री सिंहगड रस्त्यावरील कॅनॉलमध्ये मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार पोलीसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाचा खिशात चिट्ठी सापडली असून त्यात “कोरोना आजार होऊन हालहाल होऊन मरण्यापेक्षा मी आत्महत्या करीत आहे असा उल्लेख आहे.

अनिल खाटपे धायरीतील गारमाळ परिसरात कुटुंबियांसह राहत होते. त्यांना दोन मुले आहेत. लॉकडाऊनमुळे मागील काही दिवसांपासून ते चिंतेत असल्याची माहिती कुटुंबियांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, सिंहगड पोलिसात याप्रकरणी आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related posts

शांताबाई फेम संजय लोंढे यांना मदतीचा हात !

Vishal Khandagale

व्हिडीओ कॉन्फरेंस द्वारे कृतज्ञता व्यक्त : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

Vishal Khandagale

महापालिका प्रशासन सज्ज; कमला नेहरू रुग्णालयात होणार शुभारंभ

Vishal Khandagale

Leave a Comment