पिपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रराष्ट्रीय

बिल गेट्स यांचा मायक्रोसॉफ्ट’च्या संचालक पदाचा राजीनामा!

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स (वय 64) यांनी बोर्ड ऑफ संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. समाजसेवा करण्यासाठी बिल गेट्स यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा दिला असला तरी ते मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांच्यासोबत सल्लागार म्हणून काम करत राहणार आहेत.
बिल गेट्स यांनी राजीनामा दिल्याची माहिती कंपनीने शुक्रवारी मध्यरात्री दिली आहे. जगातील सर्वात श्रीमंताच्या यादीत बिल गेट्स यांचे दुसरे स्थान आहे. बिल गेट्स यांना जागतिक स्तरांवर समाजसेवा करायची आहे, त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
बिल गेट्स यांनी म्हटले आहे की, “मायक्रोसॉफ्ट नेहमी माझ्या आयुष्यातील अविभाज्य भाग राहिले आहे. मला दोन्ही कंपन्यांवर अभिमान आहे. आगामी आव्हानाचा मी सकारात्मक पद्धतीने विचार करतो. त्यासाठी मी तयार आहे.
बिल गेट्स यांनी 1975 साली पॉल एलन यांच्यासोबत कंपनीची स्थापना केली. वर्ष 2000 पर्यंत ते कंपनीचे सीईओ या पदावर कार्यरत होते. 2008 मध्ये त्यांनी समाजसेवा करण्यासाठी बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली होती. 2018 मध्ये संस्थेने जवळपास 355 कोटी रुपये दान केले होते. ते 2014 पासून कंपनीच्या संचालक पदावर कार्यरत होते.

Related posts

ब्रेकिंग! राज्यात आजपासून कडक निर्बंध, राज्य सरकारकडून नवीन नियमावली जारी

Vishal Khandagale

भारतात बनणार, परदेशात निर्यात होणार उडती कार लिबर्टी

Vishal Khandagale

बनावट एफडीआर प्रकरणी पाच ठेकेदारांवर गुन्हा

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX