गुन्हे विषयकपिपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रराष्ट्रीय

राज्य सरकाचा नवा आदेश, 1 एप्रिलपासून सर्व खाती राष्ट्रीयकृत बँकेत

जनतेचा पैसा सुरक्षित राहण्यासाठी राज्य सरकारने हे पाऊल उचलले आहे. भविष्यात कोणताही धोका होऊ नये म्हणून महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला. त्याबाबत शासन अध्यादेश जारी केला आहे.
खासगी अथवा सहकारी क्षेत्रातील बँकांमध्ये कोणत्याही शासकीय योजनांचा निधी (वेतन व भत्ते व्यतिरिक्त) जमा करण्यासाठी उघडण्यात आलेली बँक खाती 1 एप्रिल, 2020 पासून बंद करावीत. आणि केवळ राष्ट्रीयकृत बँकांमध्येच खाती उघडावीत, असे या शासन परिपत्रकात म्हटले आहे.
1 एप्रिल, 2020 पासून कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते यासाठी केवळ राष्ट्रीयकृत बँकांमधील खात्यात जमा करण्याचे स्पष्ट म्हटले आहे. तर निवृत्ती वेतनधारकांनी शासन निर्णयाच्या अनुषंगाने त्यांची बँक खाती त्यांच्या सोयीच्या दृष्टीने खासगी अथवा सहकारी क्षेत्रातील बँकामध्ये उघडली आहेत. तथापि, त्यांनीही निवृत्ती वेतन बँक खाती राष्ट्रीयकृत बँकामध्येच उघडण्याची दक्षता घ्यावी, असे आवाहन राज्य शासनामार्फत करण्यात आले आहे.

Related posts

आयुक्तांच पुणेकरांना आवाहन

Vishal Khandagale

राज्यातील शाळा सुरु होणार

Vishal Khandagale

उद्यापासून दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX