पुणे

भाजीपाला, गाळेधारक इतर व्यावसायिकांना न्याय मिळवून देणार : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

भाजीपाला, फळ, पान, तरकारी,पूजा साहित्य व भुसारी विक्रेत्यावर पुणे महापालिका व पुणे मेट्रो यांच्याकडून नाहक त्रास दिला जात आहे. त्यांना आपण न्याय मिळवून देणारा असल्याचे अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी मंडई येथील विक्रेत्यांना आश्वाशन दिले.

मंडई येथील व्यावसायिकांवर काही दिवसापासून अन्याय होत असल्याने आज प्रकाश आंबेडकर यांनी महात्मा फुले मंडई येथे भेट देऊन या व्यावसायिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

आंबेडकर म्हणाले की, मी मेट्रोचा आराखडा पाहिला असून त्यानुसार कार्यवाही करावी आणि येथील व्यापारी जागा द्यायला तयार आहेत. परंतु त्यांचे पहिले पुनर्वसन करावे, अशी त्यांची मागणी आहे आणि ती बरोबर आहे. मंडई येथील या मध्यमवर्गीय व्यावसायिकांना न्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे, असा विस्वास त्यांनी येथील स्थानिक व्यावसायिकांना दिला.

यावेळी स्थानिक व्यावसायिक यांनी त्यांच्या समस्या आंबेडकर यांना सांगितल्या. यामध्ये आहे त्या जागी पुनर्वसन करावे, भाडेवाढ रद्द करावी, गाळे दुरुस्ती करावी, रोज स्वछता व साफसफाई करावी, करारनामा रद्द करावा यासारख्या मागण्या त्यांनी आंबेडकर यांना सांगितल्या.

यावेळी मंडई विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ काची , वंचित आघाडी युवक अध्यक्ष अतुल नाडे ,वंचित आघाडीचे देखरेख समिती सदस्य अतुल बहुले, शहराध्यक्ष मूनवर कुरेशी , भाजीपाला संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कासुरड्डे, राहुल खोपडे, संतोष कुदळे, कमलेश काची, राजू शहाणे, महेश जाधव सहभागी झाले होते.

Related posts

स्व. महेश जाबूळकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पुणे कॅम्प येथे शोकसभेचे आयोजन !

Vishal Khandagale

२१०० कर्मचाऱ्यांना पगारच नाही

Vishal Khandagale

नागरीकांसाठी धार्मिक स्थळे बंद

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX