Pune City News
खेळ

“भारतीय महिला हॉकी संघ निर्भिडपणे खेळत आहे”

Pune City News:- हरियाणाच्या नवनीत कौरला असे वाटते की संघाच्या स्वतःकडे बघण्याच्या दृष्टीकोनातिल बदलामुळे त्यांच्या अलीकडील यशात मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे.

भारतीय महिला हॉकी संघाने नुकत्याच केलेल्या या वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंड दौर्‍यातिल कामगिरीतील प्रगतीचे कारण म्हणजे संघाने दृष्टिकोनात बदल घडवून आणले, असा विश्वास, भारतीय संघाची स्ट्रायकर नवनीत कौरने दर्शविलेला आहे.

ती म्हणाली, “यापूर्वी आम्हाला ग्रेट ब्रिटन, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या अव्वल संघांविरुद्ध खेळण्याची भीती वाटत होती. आमच्यात सामना जिंकण्याचा आत्मविश्वास उरला नव्हता आणि म्हणूनच कदाचित अनेक संघांनी आम्हाला अंडरडॉग म्हणूनही मानले होते.”

म्हणूनच जेव्हा न्यूझीलंड दौर्‍यात भारतीय महिला संघाने घसघशीत यश मिळविले, तेव्हा हरियाणाच्या नवनीत कौरला असे वाटले की संघाच्या स्वतःकडे बघण्याच्या दृष्टीकोनातिल बदलामुळे त्यांच्या अलीकडील यशात मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे.

“महत्त्वाचे सामने जिंकण्याव्यतिरिक्त, मला असे वाटते की या बदलांमध्ये आणखी बरेच घटक कारणीभूत आहेत आणि त्यातील एक मुख्य घटक म्हणजे आमचे प्रशिक्षक सोजर्ड यांची खेळाची शैली आहे. त्यांना आक्रमकता आवडते. त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आहे की आम्ही असा संघ आहोत जो आपल्या आक्रमणात चांगल्या वेगाने खेळू शकतो,” असे नवनीत म्हणाली.

संघाच्या अलीकडील कामगिरीतील फिटनेस एक महत्त्वाचा घटक होता आणि नवनीत म्हणाली की संघात तंदुरुस्ती आणि आहार याविषयी खूप जागरुकता आहे. फिटनेसमधील आमची सुधारणा ही आणखी एक मोठी बाब आहे, असा माझा विश्वास आहे.

Related posts

आयपीएल क्रिकेट स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली

Vishal Khandagale

खेळ हा सर्वसामान्‍यांच्‍या जीवनशैलीचा भाग व्‍हायला हवा’

Vishal Khandagale

ICC कसोटी क्रमवारी; भारत अव्वल स्थानावर

Vishal Khandagale

Leave a Comment