मनोरंजनमहाराष्ट्रराष्ट्रीय

गायिका कनिका कपूरला ‘कोरोना’ची लागण

Pune City News:- बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरला कोरोनाची लागण झाली आहे. इन्स्टाग्राम अकाउंटवरून तीने आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे जाहीर केले आहे.

‘बेबी डॉल मैं सोने दी’ व ‘चिट्टीया कलाईया’ या प्रसिद्ध गाण्याची गायिका कनिका कपूरला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून, काही दिवसांपूर्वी ती लंडनवरून परतली होती.

कोरोनाची लागण झाल्यानंतर ती एका हॉटेलमध्ये थांबली होती तसेच एका डिनर पार्टीतसुद्धा ती सहभागी झाली होती. या पार्टीत जवळपास 100 लोकांच्या संपर्कांत आली असल्याचं सांगितले जात आहे.

या पार्टीसाठी उपस्थित असणाऱ्या राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे तसेच खासदार दुष्यंत सिंग उपस्थित होते.

काही दिवसांपूर्वी दुष्यंत सिंग यांची संसद भवनात उपस्थिती होती. त्यामुळे कोरोना आता संसदेच्या उंबरठ्यावर पोहचला आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Related posts

‘EPFO’ आणि ‘ESIC’ च्या बदलांवर शिक्कामोर्तब

Vishal Khandagale

‘होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी’; देशमुख

Vishal Khandagale

पुणे विभागात डॅश बोर्ड विकसित

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX