कोरोनाविरुद्धच्या सुरु असलेल्या लढाईत मेडिकल स्टाफच्या मदतीसाठी केरळमधून ५० पेक्षा अधिक डॉक्टर्स, नर्सेस मुंबईत येणार असल्याची माहिती डॉ. संतोष कुमार यांनी दिली आहे.
कोरोना रुग्णांवर उपचार करताना मुंबईला आणखी मनुष्यबळाची आवश्यकता असून केरळहून १६ डॉक्टरांची टीम आज मुंबईला पोहोचण्याची शक्यता आहे.
पुढच्या काही दिवसात केरळहून ५० डॉक्टर आणि १०० नर्सेस मुंबईत येणार असून सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये डॉक्टर काम करणार आहेत.
ते वैद्यक कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित रुग्णालय असून मुंबईत मेडिकल स्टाफच्या मदतीसाठी येणारे डॉक्टर केरळात खासगी क्षेत्रामध्ये काम करतात.
दरम्यान, सदरील डॉक्टर स्वच्छेने आपल्या सहकाऱ्यांची मदत करण्यासाठी येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

