Pune City News
कोरोनागुन्हे विषयकपुणे

येरवडा पोलीस ठाणे व पेपल सेमनरी कडून गरजू व गरीब नागरिकांना किराणा वाटप!

Pune City News :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू असून गरीब,गरजू व हातावर पोट भरणारे तसेच परप्रांतीय मजूर लोकांचे दोनवेळचे जेवणाच्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत. अशावेळी सेवाभावी संस्था व पुणे शहर पोलीसांकडून मानवतेच्या भावनेतून अशा गरीब, गरजू नागरिकांना जिवनावश्यक वस्तू, अन्नधान्य वाटप करून मदत करण्याचे काम…..

दि.१०/०४/२०२० रोजी व.पो.निरी.श्री.युनूस शेख यांचे मार्गदर्शनाखाली येरवडा पो.स्टे.चे हद्दीतील पेपल सेमिनरी या ख्रिश्चन प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून पो.उप.निरी. विठ्ठल माने, पो.ना. विकास शिरखांडे, पो.ना. जगताप यांनी येरवडा पो.स्टे.हद्दीतील कल्याणीनगर भागातील संमिश्र लोकवस्ती, रेणूकावस्ती, कल्याणीनगर तसेच कोरेगावपार्क पो.स्टे.हद्दीतील मिळून २२५ गरजू,गरीब,हातावर पोट भरणारे लोकांना अन्नधान्य/जिवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

तसेच चिमा घाट येथे देखील झोपड्यात राहणारे तसेच फुटपाथवरील गरीब, गरजू ५० लोकांना जेवणाचे फुड पॅकेटस् वाटप करण्यात आले.

Related posts

भाजप नगरसेविकेच्या मुलाने पिस्तुलाने स्वत:वर झाडून घेतली गोळी

Vishal Khandagale

“काळजी नसावी” शरद पवार

Vishal Khandagale

बौद्ध पौर्णिमा घरातच साजरी !

Vishal Khandagale

Leave a Comment