पुणे

पुण्याचे नवे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची नियुक्ती

GUPTA

पुणे शहराचे नवे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता  यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ.के.व्यंकटेशम या अगोदर पुण्याचे आयुक्त होते. गृहमंत्र्यालयाकडून रात्री उशिरा याबाबतचे आदेश काढण्यात आले.

  •  डॉ. के. व्यंकटेशम यांची बदली, विशेष अभियान महाराष्ट्र राज्याच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे शहराचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी ऑगस्ट २०१८ मध्ये सूत्रे हाती घेतली होती. तेव्हा पासून आजअखेर नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने अनेक उपक्रम राबवून, पोलीस आणि नागरिकांमध्ये संवाद वाढविण्याचे काम त्यांच्या या कार्यकाळात केले गेले आहे.

या अनेक उपक्रमाचे पुणेकर नागरिकांकडून विशेष कौतुक करण्यात आले आहे. डॉ. के. व्यंकटेशम यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांच्या जागी अमिताभ गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच पुणे ग्रामीण अधीक्षक संदीप पाटील यांची गडचिरोलीमध्ये बदली झाल्यावर त्यांच्या जागी कोल्हापूर पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांची पुणे ग्रामीण अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारकडून पुन्हा एकदा अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

Related posts

गोवा राज्य सरकारचा “पर्यटन बंद” चा निर्णय

Vishal Khandagale

‘महाराष्ट्रात आणखी आठ स्पेशल ट्रेन

Vishal Khandagale

‘येस बँक’ निर्बंधमुक्त होणार!

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX