कोरोनामहाराष्ट्र

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 186 वर

Pune City News:- कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असून आतापर्यंत राज्यातील रुग्णांच आकडा 186 वर गेला आहे. तर, आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या भीतीनं संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरू असतानाही वाढता जाणारा रुग्णांचा आकडा चिंता वाढवणारा आहे.संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरस हळूहळू भारतात झपाट्याने वाढत चालला आहे. 14 एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद करण्यात आल्या आहेत.देशासाठी 21 दिवस महत्त्वाचे आहेत. जर आपण हलगर्जीपणाने वागलो तर मोठा अनर्थ घडेल असा गंभीर इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला होता.

Related posts

कोरोनाच्या दिवसाला एवढ्या चाचण्या !

Vishal Khandagale

राहुल गांधींच्या अटकेचा निषेध; काँग्रेसचं मुंबईसह राज्यभरात आंदोलन

Vishal Khandagale

पुण्यात ६५ कंटेन्मेंट झोन

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX