कोरोनापुणे

कोरोना : इन्फोसिस च्या कर्मचारयाला कोरोना ची लागण

Pune City News:- पुण्याच्या आयटी क्षेत्रातील कंपन्यांनी जास्त खबरदारी घेण्याची वेळ आली आहे. इन्फोसिस या आयटी कंपनीतील एका कर्मचाऱ्याला करोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. कंपनीनेच याबाबत सर्व कर्मचाऱ्यांना ई-मेलव्दारे एक निवेदनाने याबाबत माहिती दिली आहे.
इन्फोसिसने आपल्या निवदेनात म्हटले की, ज्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे त्याला आपण सर्व प्रकारची मदत पुरवणार आहोत. त्याचबरोबर आरोग्य विभागाशी संपर्क साधून इतरही बाधितांचा शोध घेण्यास सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर याबाबत आवश्यक ती पावलं उचलण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. रिपब्लिक या संकेतस्थळाने याबाबत वृत्त दिले आहे.तसेच अनावश्यक भीतीपासून वाचण्यासाठी, संभाव्य व्यक्तींच्या संपर्कात आल्याचे जर कोणाला वाटत असेल तर खबरदारीचा उपाय म्हणून अशा व्यक्तीनं चौदा दिवसांसाठी स्वतःला घरात क्वारंटाइन करुन घ्यावं, असा सल्लाही कंपनीने कर्मचाऱ्यांना दिला आहे. त्याचबरोबर शासकीय आरोग्य सल्लागाराद्वारे कळविलेल्या उपायांबाबत सल्ला घ्यावा, असेही आवाहन करण्यात आलं आहे.या निवदेनात असंही म्हटलंय की, कंपनीकडून संपूर्ण कॅम्पसची पूर्णपणे स्वच्छता करण्यात येईल तसेच प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केले जाईल. दरम्यान, स्वच्छतेसाठी SDB 1, SDB 4 and FC 1 हे विभाग बंद ठेवण्यात येणार आहेत. इथं पुढील ४८ तास (मंगळवारी संध्याकाळपर्यंत) स्वच्छतेचं काम चालणार आहे.

Related posts

उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला भेट

Vishal Khandagale

बांधकाम व्यवसाय स्वयंस्पुर्तीने कामबंद : क्रेडाई पुणे मेट्रो

Vishal Khandagale

कोरोना संसर्गाच्या सद्यस्थितीची सर्वपक्षीय आढावा बैठक पार……

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX