Pune City News
राष्ट्रीय

रेल्वेच्या ऑनलाईन बुकिंगला सुरुवात

Pune City News:- एक जूनपासून भारतीय रेल्वेकडून 200 विशेष गाड्या सुरू करण्यात येणार आहेत. त्याचे यादी आणि वेळापत्रकही तयार करण्यात आले आहे. या गाड्यांसाठीचे रेल्वे बुकिंग आज (गुरुवार) पासुन ऑनलाईन बुकिंग सुरू करण्यात आले आहे.

यात 50 रेल्वेगाड्या मुंबईहून सुटणाऱ्या आणि मुंबईकडे येणाऱ्या असणार आहेत. पुणे स्थानकावरून सुटणारी आणि पुणे स्थानकापर्यंत येणारी पुणे-दानापूर ही एकमेव रेल्वेगाडी असणार आहे. या रेल्वेगाड्यांच्या प्रवाशांनी गाडीच्या वेळेपूर्वी दीड तास आधी रेल्वेस्थानकावर पोहचणे बंधनकारक करण्यात आले आहे. 

पहिल्या टप्प्यात फक्त नॉन एसी रेल्वे गाड्या धावणार आहेत, असे रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी जाहीर केले होते. मात्र आता एसी आणि जनरल बोगीही असणार आहेत. तिकिटाचे बुकिंग फक्त IRCTC च्या वेबसाइट आणि अ‍ॅपवरून होणार आहे.

या स्पशेल 200 ट्रेनने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना रेल्वे निघण्यापूर्वी 90 मिनिटे आधी रेल्वेस्थानकावर येणे बंधनकारक आहे.

Related posts

फिल्मसिटी काढायला निघालेल्या राज्यात महिला सुरक्षित नाहीत; डॉ. नीलम गोऱ्हे

Vishal Khandagale

देशात आणखी चार सरकारी बँकांचे होणार खासगीकरण

Vishal Khandagale

भय्यू महाराज आत्महत्येप्रकरणी ; न्यायालयाने तिघांना ठरवलं दोषी

Vishal Khandagale

Leave a Comment