Pune City News
पुणेमहाराष्ट्र

पुणे विद्यापीठाची ‘सेट’ परीक्षा लांबणीवर

Pune City News :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत महाराष्ट्र व गोवा राज्यासाठी येत्या 28 जून रोजी सहायक प्राध्यापक पदांच्या पात्रतेसाठी घेतली जाणारी ‘सेट’ अर्थात राज्य पात्रता परीक्षा पुढे ढकलली आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने विद्यापीठाने हा निर्णय जाहीर केला आहे.

विद्यापीठाच्या ‘सेट’ विभागामार्फत यंदा जूनमध्ये सेट परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी 1 लाख 11 हजार उमेदवारांनी अर्ज केले असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत अर्जाची संख्या 9 हजारांनी वाढली आहे.

ही परीक्षा मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोवा या 15 ठिकाणच्या 112 महाविद्यालयांच्या केंद्रांवर घेण्यात येणार होत्या. या परीक्षांचे नवे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे.

Related posts

मंगळवार पेठ “Micro Containment Zone” पहा !

Vishal Khandagale

मागील पाच वर्षे सत्तेत असलेल्यांचा नामांताराचा ढोंगीपणा- बाळासाहेब थोरात

Vishal Khandagale

पालखी सोहळ्यावर कोरोना चे सावट !

Vishal Khandagale

Leave a Comment