Pune City News
महाराष्ट्र

विदर्भ, मध्य महाराष्ट्र, कोकणाला पावसाचा इशारा

rain

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम अद्यापही मुंबईवर असून, सलग तिस-या दिवशी म्हणजे शनिवारी देखील मुंबईमध्ये ढगाळ हवामानाची नोंद झाली.

येथील हवामान ढगाळ नोंदवितानाच कमाल आणि किमान तापमानातदेखील कमालीचे चढ उतार नोंदविला जात आहे.

शुक्रवारी झालेला पाऊस आणि हवामानातील बदलामुळे कमाल तापमानात कमालीची घट नोंदविली असून, सोमवारनंतरच मुंबईकरांना मोकळ्या आकाशासह सुर्यनारायणासह दर्शन होणार आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवस मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगढमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुढील दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबईमधील हवामान रविवारीदेखील ढगाळ राहण्याची शक्यता असून, तापमानात चढ उतार नोंदविण्यात येतील.

गेल्या तीन दिवस हवामानात झालेल्या बदलामुळे कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत ४ अंशांनी खाली घसरले. आता मात्र यात वाढ होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

Related posts

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द !

राज्यातल्या डॉक्टर्स च्या सुट्टया रद्द

Vishal Khandagale

कोरोना: ‘एमपीएससीची पूर्वपरीक्षा वेळापत्रकानुसारच’

Vishal Khandagale

Leave a Comment