Uncategorized

सावित्रीबाई फुले ( पुणे ) विद्यापीठाचे नवीन शैक्षणिक वर्ष ऑनलाईन सुरू

PUNE CITY NEWS :- सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कामकाज ५ ऑगस्टपासून ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिली आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात ५ ऑगस्ट पासून करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार यांसह आदी पदाधिकरी यावेळी उपस्थित होते.
यावेळी कुलगुरू यांनी सांगितले की, कोरोनाच्या संकटामुळे यंदाच्या वर्षी महाविद्यालये करोना सुरू करण्यास मर्यादा आहे. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण ही गरज निर्माण झाली आहे.

या बाबी लक्षात घेऊन विद्यापीठाने केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाचे स्वयम अभ्यासक्रमांचे मापन केले. हे अभ्यासक्रम विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाशी मिळते जुळते असल्याचे अभ्यासाअंती लक्षात आले. तरी या परिपूर्ण अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाकडून समिती नेमण्यात आली आहे. असेही कुलगुरू यांनी सांगितले.

Related posts

“27 सप्टेंबर” जागतिक वृक्ष दिवस !

Vishal Khandagale

कोरोना विषाणु ची टेस्ट कीट “My Lab” ने बनवली !

Vishal Khandagale

वाहनधारकांना दिलासा; घेतला ‘हा’ निर्णय!

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX