Pune City News
Uncategorized

विमानातील मधलं सीट रिकामं ठेवा; DGCA चे निर्देश

PCN

कोरोनाच्या संकटादरम्यान देशांतर्गत उड्डाण सेवेला सुरुवात झाली आहे. या दरम्यान प्रवासात कोरोनाचा धोका कायम आहे.

प्रवाशांचा प्रवास आणखीन सुरक्षित बनवण्याच्या दृष्टीने नागरी उड्डाण संचालनालय (DGCA) ने आणखीन एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.

डिजीसीएकडून एअरलाईन्सला, मधलं सीट रिकामं राहील, असे प्लान बनवण्याचे निर्देश दिले आहेत. या नव्या गाईडलाईन्स 3 जूनपासून लागू होतील.

डीजीसीएच्या गाईडलाईन्स जारी करताना एक पत्र प्रसिद्ध केलंय. मधलं सीट रिकामं राहील, अशी व्यवस्था करताना एअरलाईन्सनं तिकीट इश्यु करावेत.

परंतु, प्रवाशांची संख्या जास्त असेल तर मधल्या सीटवर बसणाऱ्या व्यक्तीला मेडिकल सेवांसाठी वापरला जाणारा गाउन, थ्री लेअर फेस मास्क आणि फेस शील्ड पुरवण्यात यावं, असे निर्देशस देण्यात आलेत.

विमान प्रवासात प्रवाशांना एअरलाईन्सकडूनच सेफ्टी किट पुरवण्यात यावेत, असंही डीजीसीएनं म्हटलंय. यामध्ये, तीन लेअर असणारा सर्जिकल मास्क, फेस शील्ड आणि सॅनिटायझर यांचा समावेश असेल.

प्रत्येक उड्डाणानंतर विमान सॅनिटाईज करण्याचे आदेशही देण्यात आलेत. तसंच पायलट, एअर होस्टेस यांच्यासोबतच बाकी क्रूचंही नियमितपणे चेक-अप केलं जाईल.

Related posts

रशिया : रस्त्यांवर 800 वाघ आणि सिंह !

Vishal Khandagale

कुख्यात गज्या मारणेच्या टोळीतील 14 जणांना साताऱ्यात अटक

Vishal Khandagale

कोरोना: सीबीएसईच्या परीक्षेस स्थगिती

Vishal Khandagale

Leave a Comment