Pune City News
Uncategorized

कुख्यात गज्या मारणेच्या टोळीतील 14 जणांना साताऱ्यात अटक

सातारा :- पुण्यातील कुख्यात गुंड गज्या मारणेच्या टोळीशी संबधित गुंडांना वाई पोलिसांनी सापळा रचून वाई-पाचवड रस्त्यावर हॉटेल चतुर्थी चेक पोस्टवर अटक करून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने  सातारा तालुक्यात खळबळ उडाली आहे.

आर्थिक व्यवहारातून व्यावसायिकाला घेऊन पलायन करण्याच्या उद्देशाने आलेल्या 14 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये मोक्काची कारवाई करण्यात आलेल्या 14 जणांचा समावेश आहे. एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. गुरुवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत पोलीस या सर्वांकडे कसून चौकशी करत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचगणी येथील व्यावसायिक पार्टे यांच्या मालकीची नचिकेत इंग्लिश मीडियम स्कूल शाळा आहे. त्यांनी तीन वर्षापूर्वी अहमदनगर येथील एका व्यक्तीला ती तीन वर्षाच्या भाडेत्वावर चालवण्यास दिली होती. त्यापोटी संबंधित व्यक्तीने डिपॉझिट म्हणून एक कोटी रुपये पार्टे यांना दिले होते. परंतु नगरच्या व्यक्तीला शाळा चालवता आली नाही. त्यामुळे त्याने करारनामा रद्द करुन दिलेले डिपॉझिटीट पार्टे यांना मागितले होते.

यावरु दोघामध्ये अनेकवेळा चर्चा होऊन 80 लाख रुपेय पार्टे यांनी संबंधित व्यक्तीला देण्याचे कबुल केले होते. मात्र मागील वर्षी कोरोनामुळे अचानक लॉकडाऊन सुरु झाल्याने पार्टे ही रक्कम देऊ शकले नाहीत. त्यानंतर पार्टे यांनी व्यवहाराबाबत उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. न्यायालयाने पार्टे यांच्या बाजूने निकाल देऊन या व्यवहारावर स्थिगिती दिली होती. त्यामुळे नगरच्या व्यक्तीनें एक कोटी वसूल करण्यासाठी गज्या मारणे टोळीला सुपारी दिली होती.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, नगरच्या व्यक्तीला इतर अन्य गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे. त्याला पुण्यातील येरवडा तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्या ठिकाणी त्याची या टोळीतील चार जणांसोबत ओळख झाली. गुरुवारी गज्या मारणेच्या टोळीतील पंधरा जण तीन वाहनातून दुपारी वाईत आले होते. ते माबाईलवरुन सतत कॉल करुन पार्टे यांना जीवे मारण्याची धमकी देत होते. तसेच त्यांना वाईला येण्यास सांगत होते.

दरम्यान, पार्टे यांनी याची माहिती वाईत राहणाऱ्या नातेवाईकाला दिली. त्यानंतर संबंधित नातेवाईकाने वाईचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्याशी संपर्क साधून त्यांना या घटनेविषयी सर्व हकिकत सांगितली. खोबरे यांनी गांभीर्य लक्षात घेऊन तपासी पथकला सोबत घेऊन चुतर्थी हॉटेलजवळ भीमनगर तिकाटणे येथे सापळा लावून 14 जणांना ताब्यात घेतले.

Related posts

बारामतीमध्ये गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल

Vishal Khandagale

अक्षय बोराडे व सत्यशील शेरकर ची यांची नार्को टेस्ट करा – तृप्ती देसाई

Vishal Khandagale

संपूर्ण शहर आता ‘लेफ्ट वे फ्री’

Vishal Khandagale

Leave a Comment