Pune City News
महाराष्ट्र

सैराट फेम अभिनेता आकाश ठोसरच्या नावाने महिलेची फसवणूक !

Pune City News:- सैराट फेम अभिनेता आकाश ठोसर याच्या नावाने फेसबुकला बनावट खाते उघडून अहमदनगर शहरातील महिलेची फसवणूक करणार्‍या पुण्याच्या एकाला अहमदनगर सायबर सेल पोलिसांनी आज अटक आरोपी शिवदर्शन नेताजी चव्हाण ऊर्फ शिवतेज (रा. पिंपरी चिंचवडी, जि. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. महिलेकडून घेतलेले मंगळसूत्र आणि सोन्याची अंगठी पोलिसांनी जप्त केली आहे.

एमआयडीसी येथे राहत असलेल्या महिलेने अहमदनगर सायबर सेलकडे 22 मे रोजी तक्रार केली होती. या महिलेचा चार महिन्यापूर्वी फेसबुकवर सैराट फेम अभिनेता आकाश ठोसर याच्या बनावट खात्याशी संपर्क आला.

दागिने मिळाल्यानंतर शिवदर्शन याने आकाश ठोसरच्या नावाने हाताळत असलेले आणि त्याने तयार केलेले फेसबुकवरील बनावट खाते बंद केले. त्यावरून महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तिने अहमदनगर सायबर सेल पोलिसांकडे तक्रार केली.

सायबर सेलचे पोलीस निरीक्षक अरूण परदेशी, उपनिरीक्षक प्रतिक कोळी, पोलीस कर्मचारी योगेश गोसावी, उमेश खेडकर, राहुल हुसळे, दिगंबर कारखिले, मल्लिकार्जुन बनकर, यांनी पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह आणि अतिरीक्त पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत शिवदर्शन याला ताब्यात घेत त्याने महिलेकडून घेतलेले दागिने जप्त केली आहे.

Related posts

पहिली ते आठवीचे विद्यार्थी परीक्षाविना थेट पास होणार

Vishal Khandagale

आयुक्तांच पुणेकरांना आवाहन

Vishal Khandagale

घरी बसलेला सलमान ‘हे’ करतोय!

Vishal Khandagale

Leave a Comment