Pune City News:- लॉकडाऊन कालावधीत पुणे विभागातून-२५ मेपर्यत १२८ रेल्वे परराज्यात सोडण्यात आल्या आहेत. यापैकी मध्यप्रदेश -१५, उत्तरप्रदेश -५६ उत्तराखंड -२ , तमिळनाडू -२, राजस्थान – ५, बिहार -३३, हिमाचल प्रदेश १, झारखंड -६ , छत्तीसगड – ४, जम्मू-कश्मीर-१, मणीपूर- १, आसाम-१ व ओरीसा-१ अशा एकूण १२८ रेल्वे रवाना झाल्या आहेत. यामधून १ लाख ६९ हजार ८२४ प्रवासी रवाना करण्यात आलेले आहेत, असे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगीतले.
२६ मे रोजी पुणे विभागातून १२ रेल्वे रवाना होणार असून यामधून १६ हजार ८०० व्यक्ती त्यांच्या राज्यात पोहचतील. या व्यतिरिक्त ६ हजार ७६९ बसेसव्दारे १ लाख ३ हजार २८७ व्यक्तींना त्यांच्या राज्यांच्या सीमेवर व जिल्हयांमध्ये पोहचवण्यात आले आहे.
वेगवेगळया भागातून पुणे विभागात एकंदर ३३९ बसेसव्दारे ७ हजार ८० व्यक्ती आल्या आहेत, अशी माहिती डॉ. म्हैसेकर यांनी दिली.
? *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp

