कोरोनापुणे शहर

सोमवारपासून सर्व दुकाने, मॉल्स,हॉटेल्स उघडणार…

पुणे शहर:-  शहरातील दुकाने सायंकाळी  ७ पर्यंत उघडी राहणार आहेत. या बरोबरच हॉटेलदेखील रात्री १० पर्यंत सुरू राहतील. तसेच अभ्यासिका ग्रंथालये देखील ५०% क्षमतेने सुरू ठेवण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे.

येत्या सोमवारी १४ तारखेपासून या नवीन नियमांची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. ‘पुढील दोन दिवस पॉझिटिव्हिटी रेट किती आहे हे पाहिलं जाईल. त्यानंतर जर हाच कल कायम राहिला तर सोमवार पासून नवीन आदेशांची अंमलबजावणी होईल.

पुणे महापालिकेने असे केले आहेत नवे नियम :- 

  • अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने आठवड्याचे सर्व दिवस सायंकाळी सात पर्यंत खुली राहतील.
  • अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सायंकाळी सात पर्यत खुली असतील
  • अभ्यासिका, ग्रंथालय ५० टक्के क्षमतेने सुरू होणार
  • सार्वजनिक वाचनालये सुरू होणार
  • कोचिंग क्लासेस प्रशिक्षण संस्था आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सुरू होणार
  • मॉल ५० टक्के क्षमतेने सुरू होणार
  • व्यायामशाळा, सलून, ब्यूटी पार्लर, स्पा, क्षमतेच्या ५० टक्के आठवड्याचे सर्व दिवस सुरू राहणार
  • कृषी संबंधित दुकाने, आस्थापना, कृषी उत्पन्न बाजार समिती, शेतमाल विक्री सुरू राहणार
  • महापालिकेची उद्याने,खुली मैदाने, चालणे, सायकलींग आठवड्याचे सर्व दिवस पहाटे ५ ते सकाळी ९ आणि दुपारी ४ ते सायंकाळी ७ सुरू खुले असणार
  • खासगी कार्यालय कामाच्या दिवसी ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार
  • आऊटडोअर खेळ आठवड्याची सर्व दिवस सुरू राहतील.
  • इनडोअर खेळ सकाळी ५ ते ९ व दुपारी ५ ते ७ या वेळेत सुरू राहतील.
  • सामाजिक, धार्मिक, राजकीय, मनोरंजन कार्यक्रमासाठी ५० लोकांची मर्यादा
  • लग्नासाठी हॉलच्या ५० टक्के क्षमतेने जास्तीत जास्त ५० लोकांची उपस्थिती असणार
  • अंत्यविधी, दशक्रियाविधी साठी २० लोकांची मर्यादा
  • महापालिकेच्या सभा, बैठका, सहकारी संस्थांच्या मुख्यसभा ५० टक्के उपस्थितीत सुरू करता येणार
  •  इ कॉमर्स सुरू राहणार
  • सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ५० टक्के क्षमतेने सुरू
  • उद्योग नियमितपणे सुरू राहतील.

मद्यविक्री आठवडाभर सुरू:– सध्या मद्यविक्री सोमवार ते शुक्रवार या काळात सुरू होती. मात्र आता शनिवारी व रविवारी देखील मद्यविक्रीची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

चित्रपटगृह, नाट्यगृहे बंद :– शहरातील मॉल सुरू होणार असले तरी चित्रपटगृहे व नाट्यगृहे अद्यापही सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली नाही.

 

Related posts

पुणे न्यायालायचे कामकाज आता 2 शिफ्टमध्ये चालणार

Vishal Khandagale

नगररोड–वडगावशेरीत उमेदवारी दाखल

Vishal Khandagale

गोखले कन्स्ट्रक्शन्सच्या वतीने महापालिकेला निर्जंतुकीकरण कक्ष भेट !

Vishal Khandagale
Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX