Pune City News
पुणे शहर

शहरात अत्यावश्यक सेवेतील दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सायंकाळी सातपर्यंत सुरु

पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आज शुक्रवारी (दि. 18) सुधारित आदेश दिले आहेत.

पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये अत्यावश्यक सेवा मधील दुकाने ही आठवड्यातील सर्व दिवस सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरु राहतील.

  • अत्यावश्यक सेवा मधील दुकाने वगळता इतर सर्व दुकाने, मॉल, सलून, ब्यूटी पार्लर, स्पा, शनिवार व रविवारी बंद राहतील.
  • रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट हे शनिवार व रविवार फक्त पार्सल सेवा / घरपोच सेवेकरिता रात्री 11 पर्यंत सुरु राहतील.
  • कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना (बी-बियाणे, खते, उपकरणे व त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इत्यादी) तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मधील शेतमालाची विक्री करणारी दुकाने / गाळे हे आठवड्यातील सर्व दिवस सुरु राहतील.

हा आदेश पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये येणाऱ्या पुणे छावणी परिषद व खडकी छावणी परिषद यांना देखील लागू राहणार आहे.

वरील आदेशा व्यतिरिक्त इतर बाबींसाठी 11 जून रोजी दिलेल्या आदेशातील मार्गदर्शक सूचना लागू राहतील. हे बदल 18 जूनपासून लागू राहतील.

Related posts

शहरात 931 पॉझिटिव्ह रुग्ण !

Vishal Khandagale

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज काय घोषणा करणार?

Vishal Khandagale

मोदी सरकार हे जनतेची लुटमार करणारे सरकार – रमेश बागवे

Vishal Khandagale