कोरोनामहाराष्ट्र

लोकांशी माणुसकीने वागा: राजेश टोपे

Pune City News:- करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परीस्थितीबाबत माहिती देण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी शहरी भागातून गावात आलेल्या नागरिकांशी माणुसकीने वागा असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं गावात परत आलेल्या पुणे आणि मुंबईतील नागरिकांकडे कुणीही संशयाने पाहू नये. या महाभयंकर संकटाचा सामना आपण सगळ्यांनी मिळुन करायाचा आहे. गावाकडं आलेल्या लोकांमध्ये काही लक्षण आढळल्यास त्यांना रुग्णालयात घेऊन जावं. पण गावात येऊन देणार नाही, ही भूमिका राज्याला शोभणारी नाही, असं मत राजेश टोपे यांनी व्यक्त केलं आहे.
बुधवारी गुढीपाडवा आहे. हा आपल्या सगळ्यांच्या संकल्पाचा दिवस. मी घरी थांबणार आणि कोरोनाला हरवणार हा संकल्प करा आणि करोनाला हरवा असं आवाहनही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं. अनेक ठिकाणी डॉक्टरांनी ओपीडी बंद केल्या आहेत ते बंद करणं योग्य नाही. संचारबंदीतही आरोग्य सेवांना सूट दिलेली आहे. लोक आजारी पडले तर त्यांनी काय करायचं? त्यामुळे ओपीडी बंद करु नका अशी विनंतीही राजेश टोपे यांनी केली.

Related posts

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येतील मुख्य सूत्रधार अद्यापही मोकाटच

Vishal Khandagale

सीमा म्हणजे आरएसएसची शाखा आहे का ?

Vishal Khandagale

कोरोना: बाधित रुग्णांची पुष्टी होणार कीट ! बनवण्यात पुणेरी डॉ.मीनल दाखवे-भोसले यानां यश

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX