पुणे शहर :- युनायटेड हॉस्पिलिटी असोसिएशन यांच्या वतीने पुण्यातील जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या जवळ नुकतेच मूक आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी हातात फलक, बॅनर घेऊन आंदोलकांनी संचारबंदीचा निषेध केला. या वेळी असोसिएशनचे अध्यक्ष संदीप नारंग, उपाध्यक्ष ऍड अजिंक्य शिंदे, सचिव दर्शन रावल, खजिनदार समीर शेट्टी हे या प्रसंगी उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना नारंग म्हणाले की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात करण्यात आलेली संचारबंदीमुळे हॉटेल व्यवसायिकांचे कंबरडे मोडले आहे. हॉटेलांसाठी जेवणाची परवानगी सकाळी ११ ते रात्री ११ पर्यंत द्यावी त्याच बरोबर उत्पादन शुल्क परवाना शुल्काची संपूर्ण माफी करावी. तसेच सर्व परवानाधारक आतिथ्य व्यवसायांसाठी विद्युत दरात औद्योगिक दरात कपात करावी.

शिंदे म्हणाले की सन २०२१-२०२२ च्या निवासी दराच्या व्यावसायिक आस्थापनांच्या मालमत्ता करात कपात करून हॉटेल व्यवसायिकांना उभारी द्यावी. त्यानंतर रावल म्हणाले, की आमच्या उद्योगाला लावलेल्या लॉकडाउन व निर्बंधांवर फेरविचार करावा. उपरोक्त नमूद केलेल्या मुद्द्यांबाबत आम्हाला दिलासा द्यावा ही आम्ही नम्र विनंती करतो. जेवण्याच्या डिलिव्हरीसाठी परवानगी दिलेली वेळ पुरेसे नाही. त्यामुळे सरकारने आमचा विचार करून आम्हास न्याय द्यावा. युनायटेड हॉस्पिलिटी असोसिएशनच्या मागण्यांचा सर्वतोपरी विचार करून सरकारने आम्हास दिलासा द्यावा.

