पुणे शहरमहाराष्ट्र

राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसने घातले वाढत्या महागाईचे श्राद्ध !

पुणे शहर :- देशभरात कोरोनाचे संकट असतानाच केंद्र सरकारच्या वतीने महागाईचे संकट जनतेवर लादण्यात आले आहे.या महागाई विरोधात वारजे येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने दरवाढीचे श्राद्ध घालण्यात आले.राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

  • पंतप्रधान मोदींनी सत्तेत येताना जनतेला महागाईपासून मुक्तीचं, अच्छे दिनच स्वप्न दाखवलं. देशातल्या जनतेने त्यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून त्यांच्या हातात देश सोपवला.
  • मात्र, पेट्रोल-डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, खाद्यतेल अशा सगळ्याच वस्तूंचे दर वाढवून केंद्र सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर इतके वाढले आहेत की जनतेला जगण्यापेक्षा मरण स्वस्त वाटू लागलं आहे.

यामुळेच अकार्यक्षम केंद्र सरकारचा, वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी यावेळी दिली.

Related posts

धानोरी-भैरवनगरमध्ये मातोश्री गार्डनसमोर अतिक्रमणाचा विळखा; फुटपाथ नसल्याने पादचाऱ्यांचा जीव धोक्यात !

Reporter pune

मनसेचा मेळावा रद्द

Vishal Khandagale

नगर रोडवरील वाहतुकीतील बदल : प्रवाशांना दिलासा, पण स्थानिकांमध्य े नाराजी !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX