PUNE CITY NEWS :- भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी फेसबुकला पोस्ट करून मागणी केली आहे की, सत्यशील शेरकर यांच्याबरोबर अक्षय बोऱ्हाडे यांची सुद्धा नार्को टेस्ट करण्यात यावी. त्यांचं असं म्हणणं आहे की जर अक्षय बोऱ्हाडे याला मारहाण झाली आहे तर तो लाईव्ह का आला त्याने डायरेक्ट पोलीस स्टेशनला तक्रार करायला हवी होती. मग लाईव्ह यायला पाहिजे होते.
अक्षय बोऱ्हाडेला मारहाण केल्याप्रकरणी सत्यशील शेरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण तृप्ती देसाई या उद्या फेसबुकला लाईव्ह येणार आहे व त्यांच्याकडील अक्षय बोऱ्हाडे प्रकरणातील पुरावे सादर करणार आहेत. त्यामुळे तृप्ती देसाई उद्या काय पुरावे सादर करतील याकडे सर्वांचे लक्ष आहे.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=3022832184473350&id=100002397939695

