PUNE CITY NEWS :- सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा झाला आहे. विभागात अंदाजे २८ हजार ८८१ क्विंटल अन्नधान्याची तर १५ हजार २३० क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे. विभागात ३ हजार ८९५ क्विंटल फळांची आवक तसेच कांदा- बटाट्याची आवक १३ हजार ७८ क्विंटल इतकी झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे विभागात २९ मे २०२० रोजी ९३.१५६ लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून २३.४६ लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

