पिपरी चिंचवडपुणे

कोरोनाचे रुग्ण शोधण्यासाठी जिल्ह्यात घरोघरी सर्वेक्षणावर भर : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम महत्त्वपूर्ण असून पुणे जिल्ह्यात ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. कोरोनाचे रुग्ण शोधून त्यांच्यावर वेळेत उपचार मिळवून देण्याच्या दृष्टीने जिल्हयात घरोघरी सर्वेक्षणावर भर दिला जात आहे. ग्रामपंचायत क्षेत्रासाठी १ हजार ९७७ तर नगरपालिका क्षेत्रासाठी १ हजार २०३ पथकांची स्थापना करण्यात आली आहे. ग्रामपंचायत क्षेत्रात ३ लाख ५१ हजार ५१३ तर नगरपालिका क्षेत्रात १ लाख २४ हजार ४३१ नागरिकांची तपासणी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.

जिल्हयातील ४६ ग्रामपंचायत क्षेत्रासाठी १०६ झोनल व १ हजार ९७७ सेक्टर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ८ सप्टेंबर ते १६ सप्टेंबरच्या दरम्यान एकूण ३ लाख ५१ हजार ५१३नागरिकांची तपासणी पूर्ण झाली आहे.

जिल्हयात एकूण तपासणी झालेल्या नागरिकांपैकी ४ हजार ७६७ संशयित रुग्ण असून ४ हजार ६०२ नागरिकांची फ्ल्यू क्लिनिकमध्ये तपासणी करण्यात आली आहे. यापैकी ६७४ नागरिक बाधित तर ३ हजार ८०१ नागरिक निगेटीव्ह आहेत.

पॉझिटिव्ह असणाऱ्यांपैकी ५७७ रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहेत. १०६ रुग्ण गृह अलगिकरणामध्ये आहेत. निगेटीव्ह असणाऱ्यांपैकी २ हजार ५४२ नागरिक गृह अलगीकरणामध्ये आहेत.

जिल्हयातील इंदापूर, जुन्नर, मावळ, शिरुर व बारामती या नगरपालिकांसाठी ४७ झोनल व १ हजार २०३ सेक्टर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Related posts

748 गावांमध्ये राजकीय धुरळा

Vishal Khandagale

कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे; डॉ. म्हैसेकर

Vishal Khandagale

स्व.लतिकाताई साठे युवा फाउंडेशन च्या वतीने अन्न धान्य वाटप !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX