Pune City News
महाराष्ट्रराष्ट्रीय

इराण च्या उपपंतप्रधान, आरोग्य मंत्र्यांसह 25 खासदारांना कोरोना

इराणच्या उपपंतप्रधानां पासून ते आरोग्यमंत्री आणि 25 खासदारांना कोरोनाची लागण झाली आहे. चीन,इटलीनंतर आता इराणमध्येही कोरोनाने गंभीर रुप धारण केले आहे.
इराणच्या 3 खासदारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटनाही घडली. याशिवाय ब्रिटनचे आरोग्यमंत्रीही कोरोनाचे शिकार झाले आहेत.
कोरोनाच्या सर्वाधिक प्रभाव असणाऱ्या जगभरातील देशांमध्ये इराणचा तिसरा नंबर लागतो. चीन, इटलीनंतर इराणमध्ये कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत.
इराणमधील उपआरोग्यमंत्री इराज हररिची यांना देखील कोरोना संसर्ग झाला. तसेच कोरोनामुळे 3 खासदारांचा मृत्यू झाला आहे.
जिथे आरोग्यमंत्री, उप आरोग्यमंत्री आणि खासदारांनाही कोरोनाची लागण झाली, त्या देशात कोरोनाचा फैलाव किती वेगाने होतोय हे अगदी स्पष्ट झाले आहे.
खासदारांचाच कोरोनामुळे मृत्यू झाल्याने इराण सरकारही हादरले आहे. त्यामुळे इराणने आपल्या यंत्रणांना हायअलर्टवर ठेवले आहे.

Related posts

महाराष्ट्रात “भाजप” कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही

Vishal Khandagale

ब्रेकिंग! केंद्र सरकारने ‘रेमेडेसिव्हीर’ची निर्यात थांबवली

Vishal Khandagale

मुख्यमंत्र्यांनी झोपडपट्टीत फिरावं -चंद्रकांतदादा पाटील

Vishal Khandagale

Leave a Comment