Pune City News
पुणेराष्ट्रीय

उद्यापासून कोरोना लसीकरणाला सुरुवात

देशभरात सुरू होणाऱ्या कोरोना विरोधी लसीकरणात पहिल्या दिवशी तब्ब्ल तीन लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस देण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि.16 रोजी, शनिवारी कोरोनाविरोधी लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे.

लसीकरणाच्या पहिल्या दिवशी देशभरातील 2,934 केंद्रांवर कोरोना लस स्वीकारणाऱ्या काही आरोग्य कर्मचाऱ्यांशी पंतप्रधान व्हिडीओ लिंकच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.

कोविड लसीकरणाच्या प्रक्रियेवर देखरेख करण्यासाठी विकसित केलेल्या ‘को-विन’ अ‍ॅपचे याच वेळी पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन केले जाणार आहे.

देशभरातील प्रत्येक लसीकरण केंद्रावर जास्तीत जास्त 100 लाभार्थ्यांना ही लस दिली जाणार आहे.

यामध्ये डॉक्‍टर, परिचरिकांसह वैद्यकीय सहायक, सफाई कर्मचारी, रुग्णवहिकांचे चालक यांचाही समावेश असणार आहे.


आपल्या टेलिग्राम चॅनल ला Subscribe करा ..

https://t.me/joinchat/VG5_nMsC5j1O0Ih9

Related posts

ज्यू धर्मीय बांधवांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश

Vishal Khandagale

पुणे,मुंबई वगळता इतर भागात एकल दुकाने सुरू करण्यास परवानगी !

हडपसर येथील मेडिकेअर हॉस्पिटलला १४ ऑक्सिजन बेड

Vishal Khandagale

Leave a Comment