Pune City News
राष्ट्रीय

डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरूद्ध महाभियोग प्रस्ताव मंजूर..

डेमोक्रॅटिक-नियंत्रित प्रतिनिधीगृहात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरूद्ध दुसर्‍या महाभियोगावरील चर्चेनंतर महाभियोग प्रस्ताव पारित करण्यात आला.

महाभियोगाचा प्रस्ताव 197 च्या विरोधात 232 मतांनी संमत झाला. 10 रिपब्लिकन खासदारांनी महाभियोगाच्या बाजूने मतदान केले.

आता हा प्रस्ताव 19 जानेवारीला सिनेटमध्ये आणला जाईल. अमेरिकेच्या अध्यक्ष पदाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या राष्ट्राध्यक्षांवर दोनदा महाभियोग प्रस्ताव ठेवला आहे.

अमेरिकी काँग्रेसमधील प्रतिनिधिगृहात कॅपिटॉल हिल येथील हिंसाचारप्रकरणी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई केली.

या घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला होता. प्रतिनिधिगृहाने महाभियोगाची कारवाई सुरू करण्यापूर्वी उपाध्यक्ष माईक पेन्स यांना 25 व्या घटना दुरुस्तीनुसार अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची गच्छंती करण्यास सांगितले.

याबाबतचा ठराव 223 विरुद्ध 205 मतांनी मंजूर झाला होता.


आपल्या टेलिग्राम चॅनल ला Subscribe करा ..

https://t.me/joinchat/VG5_nMsC5j1O0Ih9

Related posts

‘येस बँक’ निर्बंधमुक्त होणार!

Vishal Khandagale

भारत – चीन सैनिक पुन्हा एकमेकांना भिडले

Vishal Khandagale

देशातील प्रवासी रेल्वे सेवा बंद !

Vishal Khandagale