कसबाकोथरूडखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

कमांड हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांसाठी ३३० बेड राखीव -आबा बागुल

पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना अनेक महिन्यांपासून  शहराच्या आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुणे शहरातील वानवडी येथील सैन्याचे (कमांड) हॉस्पिटल कोरोना रुग्णांवर उपचारासाठी उपलब्ध व्हावे यासाठी निवेदन देण्यात आले होते. त्या मागणीला यश आले असून कमांड हॉस्पिटल मध्ये एकूण ३३० बेड उपलब्ध करण्यात आल्याचे पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते  आबा बागुल यांनी सांगितले.

कोरोनाचे रुग्ण वाढत असताना  कमांड हॉस्पिटल मधील ३३० बेड मिळाल्यामुळे पुणेकरांना नक्कीच बेडसाठी वणवण कारवी लागणार नाही व दिलासा मिळेल असा विश्वास आबा बागुल यांनी व्यक्त केला व या अडचणीच्या काळात ३३० बेड उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रधानमंत्री व मुख्यमंत्री,पुण्याचे आयुक्त व प्रशासनाचे आभार मानले.

Related posts

पुणे शहरातील पहिला 400 KW सौर ऊर्जा प्रकल्प कोंढव्यातील थ्री ज्वेल्स अपार्टमेंटमध्ये सुरू

Vishal Khandagale

जंम्बो रुग्णालयामधील रुग्णांसाठी “ऑक्सीकुल“ या ब्रँडने आयुहेल्थ ; आयुर्वेदिक तत्वयुक्त २५००० पाण्याच्या बाटल्या भेट

Vishal Khandagale

रेमडिसिव्हीर इंजेक्शनबाबत पुणे प्रशासनाचा मोठा निर्णय

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX