महाराष्ट्रराष्ट्रीय

कोपर्डीतील निर्भयाचे आई-वडील उपोषणच्या तयारीत

मुली-महिलांवर सातत्याने होणारे अत्याचार आणि निर्घृण खून यामागे दोषींना तात्काळ फाशीसारखी शिक्षेची अमंलबजावणी न होणे या कारणामुळे कोपर्डीतील निर्भयाचे आई- वडील यांनी उपोषणाची तयारी केली आहे.

👉 सरकार कुणाचेही, असो आम्हा पीडित कुटुंबांची एकच मागणी आहे. दोषींना तात्काळ फाशी दिली जावी, अशी आर्त मागणी कोपर्डी निर्भयाच्या माता-पित्याने केली आहे. हाथरस घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांची भेट घेतली. त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

👉 सध्या देशभर उत्तरप्रदेशातील हाथरस येथील युवतीवर झालेला अत्याचार आणि तिचा क्रूर मारहाणीत झालेल्या मृत्यूने देश हादरून गेला आहे.

👉 या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातील कोपर्डी घटनेतील पीडित कुटुंबाने हाथरस घटनेवर प्रतिक्रिया दिली. १६ जुलै २०१६ ला नववीत शिकणाऱ्या निर्भयावर क्रूर अत्याचार आणि निर्घृण खून झाला.

👉 या प्रकरणातील पीडित कुटुंबाने आपल्या संवेदना हाथरस येथील कुटुंबासाठी प्रकट केल्या आहेत.

👉 निर्भयाच्या स्मारकात जाऊन नंदादीप लावून तासंतास बसून असतात. सत्र न्यायालयात फास्ट ट्रक कोर्टाने सव्वावर्षात निकाल दिला, मात्र आता उच्च न्यायालयात अडीच वर्षे उलटूनही प्रकरण प्रलंबित आहे.

👉 दोषींच्या फाशीसाठी कोपर्डी निर्भयाचे आईवडील हतबल झाले असून मंत्रालयासमोर आमरण उपोषण करण्याच्या मानसिकतेत आहे.

👉 हाथरस घटनेने सध्या देशभरातील समाजमन पुन्हा एकदा ढवळून निघत आहे. कोपर्डी असो वा दिल्लीतील निर्भया प्रकरण… हाथरस, बलरामपूर सारख्या घटना समोर येतच आहेत.

👉 त्यामुळे आता फास्ट ट्रॅक सारखीच सुनावणी उच्च-सर्वोच्च न्यायालयात होऊन दोषींना तात्काळ फासावर लटकावले जावे आणि यात जात-पात, धर्म न पाहता पीड

Related posts

नाउमेद होऊ नका, यश नक्की मिळेल : शरद पवार

Vishal Khandagale

50 टक्के सरकारी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश

Vishal Khandagale

बिल गेट्स यांचा मायक्रोसॉफ्ट’च्या संचालक पदाचा राजीनामा!

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX