Pune City News
गुन्हे विषयक

खराडी परिसरात सराईत गुन्हेगाराचा खून

murder

पुण्यातील खराडी परिसरात एका गुंडाचा दगडाने ठचून खून झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून खराडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

शैलेश घाडगे (वय ३३) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलचे काम सुरू आहे. खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट असून पूर्व वैमनस्यातून हा खून झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शैलेश घाडगे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

आज (सोमवारी) सकाळी खराडी परिसरात असणाऱ्या मोकळ्या मैदानालगत असणाऱ्या नैव्यद्यम हॉटेलच्या शेजारी एकजण रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याची माहिती नियंत्रण कक्षाकडून चंदननगर पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्रथम त्याची ओळख पटत नव्हती. मात्र पोलिसांना तो शैलेश असल्याचे समजले. त्यांनी त्याच्या नातेवाईकांना बोलावून घेतले आहे.

हा प्रकार समोर येताच परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस नेमका हा खून कोणी केला याचा तपास करत आहेत.

Related posts

राज्य सरकाचा नवा आदेश, 1 एप्रिलपासून सर्व खाती राष्ट्रीयकृत बँकेत

Vishal Khandagale

पुणे शहर युवक कॉंग्रेस कडून “अर्णब गोस्वामी” विरुद्ध गुन्हा दखल करण्याची मागणी!

Vishal Khandagale

..म्हणून केली माझ्या नवऱ्याची हत्या

Vishal Khandagale

Leave a Comment