कोरोनामहाराष्ट्र

कोरोनाच्या दिवसाला एवढ्या चाचण्या !

Pune City News:- देशात कोरोना चाचण्यांची सुविधा महाराष्ट्रात सर्वाधिक असून १३ शासकीय आणि ८ खाजगी प्रयोगशाळांच्या माध्यमातून दररोज ५ हजार ५०० चाचण्या करू शकतो, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात आतापर्यंत ६ हजार ३२३ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या असून ५ हजार ९११ जणांचे नमुने निगेटिव्ह आल्याचे त्यांनी सांगितले.

खासगी प्रयोगशाळांनाही परवानगी :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात चाचण्यांची सुविधा वाढविण्यासाठी सुरूवातीपासून केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे.राज्याच्या मागणीची दखल घेऊन केंद्र शासनाने तातडीने शासकीय महाविद्यालय आणि खासगी प्रयोगशाळांना चाचण्यांसाठी परवानगी देण्यात आली आहे.
सध्या राज्यात १३ शासकीय प्रयोगशाळांच्या माध्यमातून कोरोनाची चाचणी केली जात आहे. त्याद्वारे दररोज २ हजार ३०० चाचण्या केल्या जाण्याची क्षमता आहे. आता त्यामध्ये अजून ३ शासकीय प्रयोगशाळांना मान्यता देण्यात येणार असून राज्यात शासकीय प्रयोगशाळांची संख्या १६ होईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.राज्यात सध्या ८ खाजगी प्रयोगशाळांमधून चाचण्या केल्या जात असून त्याद्वारे दररोज सुमारे २ हजार ८०० चाचण्या केल्या जाऊ शकतात. राज्यात मोठ्या प्रमाणावर चाचण्या करण्याची आवश्यकता नसून कोरोना उपचाराच्या प्रोटोकॉलनुसार चाचण्या केल्या जात असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी संगितले.

Related posts

इराण च्या उपपंतप्रधान, आरोग्य मंत्र्यांसह 25 खासदारांना कोरोना

Vishal Khandagale

ससूनचे डॉक्टर आज रात्रीपासून संपावर जाण्याच्या तयारीत ; “या” आहे प्रमुख मागण्या !

Vishal Khandagale

एक देश एक रेशन कार्ड’ योजना सुरु!

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX