Pune City News
खेळपिपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रराष्ट्रीय

आयपीएल क्रिकेट स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली

कोरोना विषाणु चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 29 मार्चपासून सुरु होणारी आयपीएल 2020 क्रिकेट स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे.

कोरोना विषाणुचा धोका वाढल्याने केंद्र सरकारनेदेखील यावर्षी स्पर्धा घेऊ नये असा सल्ला दिला होता. तर स्पर्धा घ्यायच्याच ठरल्यास रिकाम्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवाय घ्याव्यात असे सरकारने सुचवले होते.
करोना विषाणु मुळे यंदाची आयपीएल 2020 स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचे बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी म्हटले आहे.
सार्वजनिक आरोग्य आणि आयपीएल मधील शेअरहोल्डर्स यांच्या हिताचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
आयपीएल स्पर्धेच्या नियोजनासंदर्भात बीसीसीआय व भारत सरकार, क्रीडा मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्या संपर्कात असल्याचे शहा यांनी निवेदनात म्हटले आहे.

Related posts

औषध विक्रीसाठी आता वेळ आणि दिवस ….

Vishal Khandagale

पहिल्या क्रांतिकारी विद्यार्थिनी ; यांचा पुतळा पुणे विद्यापीठात बसवा- विजय डाकले

Vishal Khandagale

आयकर रिटर्न भरण्याची ३१ मार्चची मुदत वाढवून द्यावी; मुख्यमंत्र्यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांना विनंती !

Vishal Khandagale

Leave a Comment