Pune City News
Uncategorized

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने केली तयारी

दि.५ मार्च २०२० रोजी प्रत्यक्ष पाहणी करुन मा.महापौर मुरलीधर मोहोळ यांनी घेतला. ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहा बेड असलेला विलगीकरण कक्ष नायडू रुग्णालय येथे त्वरित कार्यान्वित करण्यात आलेला असून संभाव्य उद्रेक आणि जास्त रुग्ण संख्या लक्षात घेऊन पाच मजली इमारतीमध्ये शंभर बेड तयार करण्यात आलेले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेतली जात असून महापालिकेचा आरोग्य विभाग सज्ज आहे’, अशी माहिती मा.महापौर यांनी पाहणीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
मागील पंधरा दिवसांपासून दररोज दोन वेळा डॉक्टर्स, नर्सेस,वॉर्डबॉय, आया, मेहतर मेहतरराणी यांना कोरोना संदर्भात प्रशिक्षण दिले आहे. त्याचशिवाय राज्य सरकार आणि जिल्हा परिषद यांच्याबरोबर वेळोवेळी समन्वय बैठका घेण्यात येत आहेत. तर खाजगी रुग्णालयांसोबत संयुक्तिक बैठक घेण्यात आली आहे. १० खाजगी रुग्णालयांनी एकूण ३० विलगीकरण बेड्स व ११ आयसीयू बेड्स उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली असल्याचेही मा.महापौर यांनी यावेळी सांगितले. जनजागरण अंतर्गत पुणे मनपा रुग्णालय, खाजगी रुग्णालय आणि सार्वजनिक ठिकाणी पोस्टर्स लावण्यात आलेली आहेत. रेडिओ एफएमवर आरोग्य विभागामार्फत जनजागरणपर मुलाखत आणि कोरोनविषयक माहिती प्रसार करण्यात आली आहे. नागरिकांनी या काळात खबरदारी घेणे आवश्यक असून सार्वजनिक ठिकाणी वावरतांना विशेष काळजी घ्यावी’, असेही महापौर मोहोळ म्हणाले.यावेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, आरोग्य विभागप्रमुख डॉ. राजेंद्र हंकारे, डॉ. संजीव वावरे यांच्यासह नायडू हॉस्पिटलमधील डॉक्टर्स आणि कर्मचारी उपस्थित होते.
कोरोनाचा एकही रुग्ण पुण्यात नाही.गेल्या दीड महिन्यांत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ९० रुग्णांकडे संशयित म्हणून पाहिले गेले. मात्र या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत. तर सध्या ४ रुग्ण नायडू हॉस्पिटलच्या विलगीकरण कक्षात उपचार घेत आहेत.

Related posts

सर्व्हिस रोडच्या जागी अनधिकृत गार्डन

Vishal Khandagale

अनलॉक ५ साठी राज्य सरकारकडून गाईडलाईन्स जारी

Vishal Khandagale

विमानातील मधलं सीट रिकामं ठेवा; DGCA चे निर्देश

Vishal Khandagale

Leave a Comment