Pune City News
Uncategorizedपुणेमहाराष्ट्र

नोकरी द्या…; अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन

PUNE CITY NEWS :- मराठा आंदोलनामध्ये बलिदान दिलेल्या ४२ कुटुंबांच्या पूर्ण विकासाचा प्रश्न मार्गी लावा, अन्यथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्च्यांने पुण्यात दिला आहे.

पुण्यात पत्रकार परिषदेत मराठा क्रांती ठोक मोर्च्यांने हा इशारा दिला आहे. तसेच या मृतच्या कुटुंबीयांना प्रत्येक १० लाखांची मदत व एक सदस्याला सरकारी नोकरी अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे.

यावेळी पत्रकार परिषदेत मराठा मोर्च्यांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, मराठा आंदोलनात मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख आणि कुटुंबातील प्रत्येकी एकाला नोकरीचं आश्वासन दिले होते. मात्र, या आश्वासनाची अजूनही पूर्तता झालेली नाही. तसेच २०१८ मध्ये केलेल्या आंदोलनात प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप त्यावर काहीही चर्चा झाली नाही.

मात्र आता सरकार सोबत कोणतीही चर्चा करणार नसून ४२ जणांना नोकरीत घ्यावं, अशी मागणी मराठा मोर्च्याकडून करण्यात आली आहे. अन्यथा ९ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थानी आंदोलनाला बसणार असल्याचे मराठा मोर्च्याच्या वतीने करण्यात आली आहे.

Related posts

पुणे शहरात येण्यास ” या चार गावांना बंदी

Vishal Khandagale

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार !

Vishal Khandagale

अतिसंवेदनशील भागाची मनपा व पोलिस प्रशासनाच्या वतीने पाहणी

Vishal Khandagale

Leave a Comment