Pune City News
कोरोनापुणे

कोरोना : हॉस्पिटल मधून येनारया नागरिकांचे केले रात्री 12 वाजता स्वागत !

ताडीवाला रोड परिसरातील मोठया संख्येने एकाच वसाहतीतील नागरिक आज दिनांक 5 जुन रोजी कोरोनाशी यशस्वी लढा देऊन सुखरूप आपल्या घरी परतत असताना ताडिवालारोड चे रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते मा.सुजित यादव व मेहबूब नदाफ,ताडिवाला रोड पोलिस चौकी चे पियएसआय संदीप मंचवड व परिसरातील सर्व पोलिस मित्र यांनी आपली नैतिक जबाबदारी समजून रात्री 12 वाजता त्या सर्वांचे स्वागत केले

तसेच या सर्व नागरिकांना राशन किट ही उपलब्ध करून दिले. या सर्व नागरिकांचे स्वागत करत असताना सामाजिक कार्यकर्ते मा. सुजित यादव यानी अपल्या भावना व्यक्त केल्या की…

माझ्या माहिती नुसार ताडिवाला रोड परिसरातील हे सर्व नागरिक जरी शेवटच्या टप्प्यात तील आहेत असे वाटते तरी आपल्या परिसरातील कोरोनाच संकटं अजून टळलेले नाही आपल्या मुळे व तसेच पोलीस बांधव, पुणे मनपा, विशेष पोलीस अधीकारी मित्र व काही सामाजिक कार्यकर्ते यांच्या मुळे नक्कीच 99% कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे यापुढेही सर्वजण आपण काळजीपूर्वक वागू व पुढील काही दिवसात 100% यातून बाहेर पडू अशी अपेक्षा व्यक्त केली

Related posts

पुण्यात तातडीने तीन जम्बो रुग्णालये उभारावी; अजित पवार

Vishal Khandagale

रा.स्व. संघ जनकल्याण समितीतर्फे पुण्यात विनामूल्य कोविड केअर सेंटर सुरु

Vishal Khandagale

कोरोना : कर्मचार्‍यांसाठी मोफत बस सेवा !

Vishal Khandagale

Leave a Comment