बोपोडी परिसरात एका कोरोना संशयिताने रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बोपोडी येथील एका खासगी रुग्णालयात सायंकाळी सातच्या सुमारास एका तरुणाला श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात आणले दाखल करण्यात आले होते.
तसेच गुरुवारी दुपारी त्याचे तपासणीसाठी स्वबही घेण्यात आले होते. त्यामुळे तो तणावाखाली होता.त्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास बाथरूमला जायचे असे सांगून बाहेर पडला आणि तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.
या बाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपास सुरू केला आहे.

