Pune City News :- कोरोना विषाणु प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपुर्ण देश प्रशासनाच्या आदेशाने लॉकडाऊन असल्यामुळे जवळपास दीड महिन्यापासून पिंपरी चिंचवड शहरातील पाच वर्षांची चिमुरडी मुंबई येथे आजी आजोबांकडे गेली असताना देशातील लाॅकडाऊन मुळे आईवडीलांकडे येणे शक्य नव्हते व ति चिमुरडी दिवसेंदिवस आईवडीलां पासुन दुर असल्याने खुप रडत तीचे हे रडणे दोन्ही घरच्या मंडळीचेहि अश्रु बनले होते. आशात केंद्र सरकारकडून व राज्य सरकार कडून प्रवासी पासेसची योजना करण्यात आल्यानंतर प्रवासी पाससाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात आला
परंतू पास मिळण्यास विलंब होत आहे व देशात लॉकडाउन 4.0 ची घोषणा होऊ शकते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले व या कुटुंबाचा जीव भांड्यात पडला व सदर मुलींच्या वडिलांनी रीजनल ख्रिश्चन सोसायटीचे प्रदेशाध्यक्ष नितिन रतन गायकवाड यांना संपर्क साधून मदत मागितली. नितिन गायकवाड यांनी तात्काळ राष्ट्रवादी काँग्रेस चे खासदार डाॅ.आमोल कोल्हे यांच्याशी संपर्क साधून सदर माहित कळविली आणि लगेचच या मदतीच्या हाकेला खासदार साहेबांच्या यंत्रणेनी तातडीने प्रशासकीय पातळीवर मदत करून प्रवासी पास देण्यात आला व दिनांक 13 मे रोजी त्या चिमुकली ची आपल्या आईवडीलांशी गळा भेट झाली. म्हणून महाराष्ट्र सरकार, खासदार डाॅ आमोल कोल्हे साहेब, व प्रशासनाचे खुप खुप आभार. या चिमुकली व तिच्या आई वडिलांनी मानले..

