गुरूवार दि.११/०२/२०२१ रोजी वडगांव जलकेंद्र परिसर व चतुःश्रृंगी / SNDT / वारजे जलकेंद्र परीसर येथील विद्युत/पंपींग विषयक व स्थापत्य विभागाची तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्या कारणामुळे अत्यावश्यक देखभाल दुरूस्तीचे कामांसाठी वरील पंपींगचे अखत्यारीतील पुणे शहराच्या भागाचा पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
तसेच शुक्रवार दि.१२/०२/२०२१ रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे ही विनंती पुणे महानगरपालिका पाणीपुरवठा विभाग केली आहे.
वडगांव जलकेंद्र : हिंगणे, आनंदनगर, वडगांव, धायरी, आंबेगांव पठार, दत्तनगर ,धनकवडी, कात्रज , भारती विद्यापिठ परिसर, कोंढवा बु इत्यादी.
चतुःश्रृंगी /एस.एन.डी.टी/वारजे जलकेंद्र : पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:श्रृंगी परिसर, गोखले नगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधान, बाणेर, चांदणी चौक इ. परिसर किष्किंदा नगर, रामबाग कॉलनी, डावी उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज परीसर, महात्मा सोसायटी, गुरू गणेशनगर, पुणे युनिर्व्हसिटी परीसर, वारजे हायवे परीसर, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्लयुलर नगर, अतुल नगर, शाहू कॉलनी, वारजे जलशुध्दीकरणाचा परीसर, औंध बावधन, सुस, सुतारवाडी, भुगाव रोड परीसर इत्यादी.

