पुणे

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली संजीवन समाधीची पहाटपूजा

कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२४ व्या संजीवन समाधी सोहळा, कार्तिकी एकादशीची पहाटपूजा पहाटे साडेतीन वाजता समाधीवर पवमान अभिषेक व दुधारती अकरा ब्रम्हवृन्दांच्या वेदघोषात संपन्न झाली.

रात्री पावणे दोन वाजता मुख्य महापुजा व पवमान अभिषेकास सुरुवात झाली माउलींच्या समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून पंचामृत अभिषेक करण्यात आला. त्यासाठी दूध, दही, तूप, मध, साखर, आम्रखंड, सुगंधी तेल, उटणे, अत्तर यांचा वापर करण्यात आला.

केशरी मेखला, शाल, तुळशीचा हार आणि डोईवर सोनेरी मुकुट ठेवून समाधीला आकर्षक रूप देण्यात आले.साडेतीन वाजता धुपारती होऊन समाधीचे दर्शन उपस्थित मोजक्याच भाविकांसाठी खुले करण्यात आले. महापुजे दरम्यान मंदिराचा परिसर दिव्यांच्या लख्ख प्रकाशात उजळून निघाला होता.

महाद्वारावर,देऊळ वाडा फुलांनी सजविण्यात आला होता.मंदिरा समोर साकारलेली रांगोळी उपस्थितांचे मन जिंकून घेत होती.आकर्षक रंगावलीमुळे मंदिर शोभून दिसत होते.सनई -चौघड्याच्या वादनाने आसमंत भक्तिमय झाला होता.

Related posts

“या” दिवशी शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा राहणार बंद !

Vishal Khandagale

कोरोना: “राज्यभरात एकूण 1 हजार 330 बेड”

Vishal Khandagale

३ सप्टेंबरपासून ‘पीएमपील ‘ची बस वाहतूक सुरु करण्याचा निर्णय !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX